Tuesday, September 4, 2012

John Dickson Carr यांच्याबद्दल काही... भाग २

पेनसिल्वानियातील एक जुनी हवेली - त्यात राहणारा निवृत्त जज आणि त्याचे  कुटुंब - पत्नी आजारी - अंथरूणाला खिळलेली - 
सर्वात मोठा मुलगा, टॉम, वडिलांशी भांडून घर सोडून गेलेला - घरात एक तणाव -  टॉमनंतरची मेरी, रूपाने डावी असल्यामुळे
 अविवाहित राहिलेली, त्यानंतरच्या क्लारीसा (ही खूप सुंदर) आणि जिनी - व शेवटचा मॅट -  आणि खूप वर्षानंतर या सर्वाना
 भेटायला आलेला टॉमचा मित्र, जेफ मार्ली - जिनीचा होणारा पती पॅट रॉसिटर - आणि क्लारीसाचा पती...
         या पात्रांना घेऊन Carr आपली कहाणी रंगवत नेतात - आणि शेवटी हा गोफ उलगडतात - गुन्हा आणि तो घडण्यामागची 
प्रेरणा यांची उकल करतात - आत्यंतिक प्रेम - आणि मृत्यूचे कुतूहल वाटणारे necrophile व्यक्तिमत्व - पॅट रॉसिटर शेवटी म्हणतो 
- "I am not sure, but I rather suspect  she was a necrophile. You might consult Krafft-Ebing. ... By necrophile I mean 
a being who's fascinated by death and the dead; enthralled by them, in fact. Necrophiles love to be in sick-rooms,
and to prepare the dead for burial, and they delight in the tasks normal people shudder at. A number of famous 
woman poisoners have been in this category..." 
        कादंबरी संपते - सुन्न करते  - मानवी भावबंधांची एक विलक्षण वीण अंतर्बाह्य थरारून टाकते...  

No comments:

Post a Comment