रम्य त्या रहस्यकथा
Saturday, December 8, 2012
Tuesday, October 2, 2012
'द मॅन विथ द क्लबफुट' - लेखक डग्लस वॅलेंटाईन
पुस्तक नावाचा ऐवज रंगवत न्यायला काय पाहिजे? तर एक म्हणजे 'कथानक' ही गोष्ट मुळात हवी - आणि दुसरे म्हणजे
ती रंगवणारा, रंगवत रंगवत त्यात गुंतणारा, आपल्या कथेबद्दल आत्यंतिक जिव्हाळा असणारा लेखक... जर या दोन
चिजा असतील त्याने बेलाशक पांढऱ्यावर काळे करावे - वाचक आपोआप या समीकरणात जमा झालेच म्हणून समजा...
एवढे पाल्हाळ लावायचे कारण सध्या वाचत असलेले पुस्तक - 'द मॅन विथ द क्लबफुट' - ही हेरकथा - पहिल्या महायुध्धाची
पार्श्वभूमी असणारी... आणि अतिशय रंजक - उघडच आहे लेखकाजवळचे गोष्ट रंगवून सांगण्याचे अफलातून कसब...
डेसमंड ओकवूड हा नायक - ब्रिटीश हेरखात्यातला त्याचा भाऊ बेपत्ता होतो - एका गुप्त संदेशाद्वारे डेसमंडला कळते की तो
जर्मनीत अडकला आहे - म्हणून नाना क्लुप्त्या लढवून डेसमंड जर्मनीत - बर्लिनला येतो - आणि त्याची गाठ पडते ती जर्मन हेरखात्यातील
Doktor Grundt बरोबर - या डॉक्टरचा एक पाय कृत्रिम - लाकडाचा - म्हणून तो 'क्लबफुट'...
'क्लबफुट' खूपच चतुर - अत्यंत निष्णात - आणि निर्दयी - पण आपला नायक त्याच्यावर हरप्रकारे मात करतो या वळणाने कथानक
पुढे सरकते - सरकते म्हणजे काय अगदी सुसाट धावते - बरीच अविश्वसनीय वळणे घेत पुढेपुढे जाते - वाचकाला पार १९१८ मध्ये नेते
- डेसमंडला कैसरसमोर नेतात तो प्रसंग तर केवळ लाजवाब - डेसमंड तिथून सुटतो तेव्हा आपण निश्वास टाकतो - इतकी अफलातून
वातावरण निर्मिती...
चित्त थरारून टाकणारे असे काही प्रत्येकाला (कल्पित असले तरीही) लागते हे खरेच...
रेव पार्ट्या करणारे अशी पुस्तके का ट्राय करत नाही कोण जाणे ;-)
रेव पार्ट्या करणारे अशी पुस्तके का ट्राय करत नाही कोण जाणे ;-)
ता. क. १ - हेरकथांचा विषय निघालाच आहे तर मॅनिंग कोल्स यांच्या 'ड्रिंक टू यसस्टर्डे' आणि 'अ टोस्ट टू टुमारो' यांच्याबद्दल लिहायलाच हवे -
त्याबद्दल पुढे लवकरच...
त्याबद्दल पुढे लवकरच...
ता. क. २ - प्रकाशक हर्बर्ट जेनकिन्स यांच्याबद्दल जरूर जरूर लिहायला पाहिजे - पी.जी. वूडहाउस यांचे ते खास प्रकाशक - म्हणून
त्यांच्याबद्दल खास ममत्व आहेच -आणि स्वत: जेनकिन्स हे अत्युत्तम विनोदी लेखक होते - जोसेफ बिन्डलेला कोण विसरू शकेल? - जेनकिन्स यांच्याबद्दल स्वतंत्रपणे लवकरच)
त्यांच्याबद्दल खास ममत्व आहेच -आणि स्वत: जेनकिन्स हे अत्युत्तम विनोदी लेखक होते - जोसेफ बिन्डलेला कोण विसरू शकेल? - जेनकिन्स यांच्याबद्दल स्वतंत्रपणे लवकरच)
Monday, October 1, 2012
'द हाय विंडो' - द डायलॉग सिम्पली crackles
फिलीप मार्लेव हा चॅंडलर यांचा नायक - मिसेस मर्डोक यांची एक
रेअर कॉईन चोरीला जाते - त्याचा तपास लावण्यासाठी मार्लेवला
बोलवण्यात येते... जसा तपास पुढे सरकतो तशी अतर्क्य घटनांची
एक मालिका सुरु होते...
न केलेल्या गुन्ह्याचा सल जवळपास आठ वर्षे बाळगणारी मेरील - तिला
छळणारी ती हाय विंडो - त्यातून पडून मरणारा माणूस -
आणि
तिच्या गिल्ट कॉम्प्लेक्सचा अतिशय खुबीने केलेला वापर - अंगावर काटा आणतो...चॅंडलर यांची भाषा तर केवळ अप्रतिम - अति उच्चभ्रू क्लब मध्ये मार्लेव रात्री जातो -
'Around the curve the whole valley spread out before me. A thousand white
houses built up and down the hills, ten thousand lighted windows and the stars
hanging down over them politely, not getting too close, on account of the patrol.'
Tuesday, September 18, 2012
'द हाय विंडो' - रेमंड चॅंडलर यांची अद्भुत दुनिया
मोजक्या शब्दांमध्ये चॅंडलर अमेरिकेतील (विशेषत: लॉस एन्जेलिसमधील) उच्चभ्रूंच्या अनैतिक व्यवहारांवर
प्रकाश टाकतात...
'द लेडी इन द लेक' ही चॅंडलर यांची मी वाचलेली पहिली कादंबरी - जुन्या पुस्तकांच्या दुकानात पेंगुईनची
क्लासिक क्राईम एडिशन मिळाली - लगेचच विकत घेतली - आणि नंतर बऱ्याच दिवसांनी वाचायला घेतली -
केवळ अप्रतिम!!! सिम्पली अ क्लास अपार्ट!!!
मोजक्या पण अतिशय धारदार शब्दांमधून चॅंडलर कथानक रंगवत नेतात. सध्या 'द हाय विंडो' अर्धी वाचून
झालीये - उद्या गणरायांचे आगमन - त्यामुळे सुट्टीच आहे - तेव्हा (मोदक आणि) नंतर राहिलेली कादंबरी बहुधा
वाचून पूर्ण होईल - त्याबद्दल लिहीनच...
Friday, September 14, 2012
'लेफ्टनंट कॅटीया' - भाग २ - पकडले जाणे - नाझींच्या ताब्यातून पलायन - आणि विजयपताका
सतत बदलणाऱ्या सीमांबद्दल कॅटीया सांगते - कधी रशियानांच्या तर कधी नाझींच्या ताब्यात - या सर्व लपंडावात कॅटीया आणि तिच्या ग्रुपला नेणाऱ्या लॉरीचा ड्रायवर दुर्दैवाने दारुडा निघतो - नशेत रस्ता चुकतो - आणि सतत बदलणाऱ्या सीमांमुळे
सर्व अलगदपणे जर्मनांच्या ताब्यात सापडतात - अत्यंत खेळकरपणे कॅटीया ही कैद कथन करते - रेग्युलर जर्मन आर्मी फारसा त्रास देत नाही - पण नंतर
कैद्यांना एसएसच्या ताब्यात दिले जाते - एसएसचे क्रौर्य या पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथनातून देखील आपल्या काळजाला घरे पाडते - हाडे फोडणाऱ्या
थंडीत एक गरोदर कैदी स्त्री तिच्या मुलाला जन्म देते - एसएसचा गार्ड त्या नवजात अर्भकाला बर्फात बसवतो - काही वेळाने त्या बाळाची मान त्याच्या
गुढघ्यापर्यंत वाकते - आणि ते अर्भक प्राण सोडते -
या सर्व यातना भोगत असताना देखील कॅटीयाला शत्रूची अस्वस्थता जाणवते - तिला माहिती नसते परंतु तेव्हा स्टालीनग्राडमध्ये जर्मनीचा
जवळपास सफाया झालेला असतो - परंतु जर्मनांच्या कर्दनकाळ ठरलेल्या रशियन katyusha फिल्ड गन्सचा धडधडाट ती ओळखते - आणि जिवावर उदार होऊन
पलायन करते - क्रॉस फायर मध्ये सापडते - मरणासन्न अवस्थेत आपल्या बाजूला येते - जागी होते तेव्हा एक हसतमुख नर्स तिच्याकडे पहात असते...
जशी जशी कॅटीया बरी होते तसे तसे रशियन सैन्याची विजय पताका फडकू लागते - फटाक्यांची लड लागावी तसे एका मागोमाग एक प्रचंड पराक्रम गाजवून रेड आर्मी नाझींचा सफाया करते (Operation_Bagration चा ओझरता उलेख्ख येतो - http://en.wikipedia.org/wiki/Operation_Bagration )
-- आणि शेवटी कॅटीयाचे प्रेम आणि होणारे लग्न युद्धामुळे मोडते - पट उधळून सोंगट्या इतस्तता: जाव्यात तशी कॅटीया आणि तिचा प्रियकर यांची कायमची ताटातूट होते - आणि एक विलक्षण चटका लाऊन हे आत्मकथन संपते...
रुसो - जर्मन युद्धाचा हा उमदा दस्तावेज अतिशय वाचनीय आहे - heartily recommended!!!

Thursday, September 6, 2012
सध्या वाचत आहे - 'लेफ्टनंट कॅटीया' - लेखिका कॅथेरीन दिविलीयें - भाग १
दिविलीयें कुटुंब मुळचे फ्रेंच - पण पोलंडमध्ये स्थाईक झालेले - कॅटीया शिकत असतानाच
दुसरे महायुध्द सुरु होते - नाझी फौजा पोलंडवर हल्ला करतात - अनेकानेक इतरांसोबत कॅटीयाचे
कुटुंब रशियात पळ काढते -
आलेल्या अमानुष आक्रमणामुळे आधी गडबडून गेलेली सामान्य रशियन जनता एका असामान्य
निर्धाराने शत्रूला तोंड देते - शत्रूच्या हादरवून टाकणाऱ्या अमानुष अत्याचारांनी - सामान्य रशियन सैनिक
हे युध्द जिंकण्याचा मनोमन निश्चय करतात. कॅटीयादेखील रेड आर्मीत दाखल होते...
ही अठरा वर्षांची छोटीशी मुलगी दोनदा जर्मनांकडून पकडली जाते - त्यावेळी असामान्य धैर्य दाखवून आपली
आणि बरोबरीच्या लोकांची शत्रूच्या तावडीतून सुटका करते - कॅटीयाला सन्मानित केले जाते - आणि लेफ्टनंट म्हणून बढती मिळते -
लेफ्टनंट कॅटीया - टेन्थ इंजिनियर्स ऑफ द फिफ्थ रेड आर्मी - काम सैन्यासाठी पूल उभारणे...
पुस्तकात सर्वत्र नर्मविनोदाची सुरेख पखरण आहे - आणि अतिशय हृद्य प्रसंग आहेत -
जनरल अलेक्सीव राउंडवर येतात - कॅटीया मुळची फ्रेंच - तिच्याशी फ्रांसबद्दल भरभरून बोलतात -
महान फ्रेंच लेखक Voltaire, Maupassant, Balzac, Zola, Romain Rolland आणि फ्रेंच क्युझिनबद्दल
बोलणे होते - जनरल अलेक्सीवना फ्रांसबद्दल असलेली माहिती पाहून कॅटीया आश्चर्यचकित होते...
जाताजाता जनरल साहेब कॅटीयाला म्हणतात...
'Ah, before I forget,' he said, 'can you tell me, lieutenant, why a well-educated and intelligent young woman takes so much pleasure in using such coarse and obscene language?'
I remained silent, blushing like a peony, and he went on.
'You shouldn't do it, you know. Always remain worthy of yourself. This war won't last forever, and it will leave you only with what you yourself have taken from it. Take what is worth while, and never do anything of which you may afterwards be ashamed. Remember what I'm telling you. War is a severe test and you should come out of it with honors...
Good-bye, my dear. Don't swear any more. Turn your mind away from the war, for war passes but life remains. On life we have to construct and sow and reap; that will be your task in the future. Don't disappoint me.'
Tuesday, September 4, 2012
'डबल बॅरल' - लेखक निकोलस फ्रीलिंग
दुसरे महायुध्द नुकतेच संपल्यानंतरचा काळ -
इन्स्पेक्टर वॅन दर वॉक ह्याला उत्तर हॉलंडमध्ये एका गुन्ह्याच्या तपासासाठी जावे लागते.
काम बरेचसे कंटाळवाणे - आणि काही महिने चालणारे असल्यामुळे वॉक दाम्पत्य तेथे जाऊन
राहते.
तपासाच्या संदर्भात तेथे त्याला बेझेन्सो भेटतो - बेझेन्सो हा ज्यू - नाझींच्या छळ छावणीत यमयातना
भोगून जिवंत राहिलेला - पूर्वायुष्यात एक अतिशय निष्णात इलेक्ट्रोनिक्स इंजिनियर - पण आता स्मृतीभ्रन्शाचा
विकार - सर्व कुटुंब होलोकॉस्टमध्ये गमावलेला -
पहिल्याच भेटीत वॅनला हे व्यक्तिमत्व deeply impress करते. पहिली भेट तपासासंदर्भात होते - पण नंतर
वॅन काहीतरी कारण काढून बेझेन्सोला वारंवार भेटतो. कुठेतरी वॅनला जाणवत राहते ती बेझेन्सोचे तपास कामातील
कौशल्य - आणि याचा बेझेन्सोच्या पूर्वायुष्याशी न जुळणारा ताळेबंद -
कंटाळवाणा तपास पूर्ण होतो - वॉक दाम्पत्य परत निघते - परतताना ते बेझेन्सोचा निरोप घेतात -
योगायोगाने वॅनची बायको ही ज्यू वसाहतीत वाढलेली असते. ती बेझेन्सोला पहिल्यांदाच भेटते -
आणि कसोशीने दडवलेले एक भीषण सत्य, अखेर बाहेर येते.
Subscribe to:
Posts (Atom)