Thursday, August 30, 2012

John Dickson Carr यांच्याबद्दल काही... भाग १

सध्या Poison In Jest वाचत आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Poison_in_Jest)
गंमतीचा योगायोग म्हणजे आपल्या जी. ए. कुलकर्णींच्या (जी. ए. खूप आपले वाटतात) 
-  पत्रांमध्ये (बहुधा सुनीताबाईना लिहिलेल्या पत्रांमध्ये) - Carr यांचा उलेख्ख आहे - 
   Carr यांच्या वातावरण निर्मितीबद्दल जी. ए. नी लिहिले आहे. अत्यंत गुढरम्य वातावरण
निर्माण करण्यात Carr खूपच माहीर होते. 
        He Who Whispers ही Carr यांची मी वाचलेली पहिली कादंबरी 
- त्यातली ती  cagliostro trick तर खासच!!! त्यानंतर  Carr  यांची  बरीच पुस्तके जमवून/मिळवून 
वाचली... त्याबद्दल नंतर येईलच... (विशेषत: The Burning Court बद्दल लिहिलेच पाहिजे - Europe मधील  
witch craft बद्दलचे वर्णन अक्षरश: आपल्यावर चेटूक करते) - आपल्याकडे नारायण धारपांची देखील वातावरण 
निर्मिती अगदी खासच... (कमल/गंगाधरराव/जयंत/समर्थ ही पात्रे - आणि विशेषत: कमल आणि गंगाधरराव 
यांचे द्वंद्व अगदी मनात घर करून राहते) 
  Poison In Jest या वीकेंडला संपेलच - त्याबद्दल एक दोन दिवसांत... 
Penguin crime and mystery ची edition आहे - म्हणजे दुग्ध शर्करा योगच ;-) 


Wednesday, August 29, 2012

'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकालाची'


  परत परत वाचावि  वाटतात  - नव्हे ओढून नेतात नंदा खरे यांची पुस्तके - आणि नंतर मन व्यापून राहतात - मग जो भेटेल त्याला सांगत बसायचे  - मराठेशाईबद्दल - ती अनामिक हुरहुर बोलून दाखवून मोकळे होण्याचा प्रयत्न -
 खरे यांची भाषा  शैली हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल - 'एकुणच गत:काळ फार याद येतो' - ते 'कशाने प्रान्त आपला होतो ... सर्व प्रांतावर  माझीच तर मुद्रा आहे' - 'कशामुळे मला सातारा आपले वाटते ...' क्या बात है अनंतराव !!!
सर्वात महत्वाचे म्हणजे या पुस्तकांच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे -  पुरबी, पंडिnत वहिनी, जाननाक, राधा, व्यंकटनाक, रखमी - यांच्या कहाण्यांमधून - इतिहासाचे महावस्त्र उलगडत जाते - खरे यांना हे प्रमुख सूत्र धरून कथानक गुंफावे वाटणे मला फार महत्वाचे वाटते -            
       शेवटचे परिशिष्ठ अतिशय मार्मिक आहे. आपल्या सदोष सामाजिक जाणीवेवर खरे नेमके बोट ठेवतात - 'इतिहास ही नेहेमीच प्रक्रिया असते ... एखादी व्यक्ती - मग ती कितीही अलौकिक असली तरी प्रक्रियेची दिशा काही काळापुरती, मर्यादित रूपातच बदलू शकते. प्रक्रिया केंद्रस्थानी, व्यक्ती त्या प्रक्रियेतूनच घडलेली, आणि फार मुलभूत बदल न करू शकणारी, हेच वास्तव असतं.'