परत परत वाचावि वाटतात - नव्हे ओढून नेतात नंदा खरे यांची पुस्तके - आणि नंतर मन व्यापून राहतात - मग जो भेटेल त्याला सांगत बसायचे - मराठेशाईबद्दल - ती अनामिक हुरहुर बोलून दाखवून मोकळे होण्याचा प्रयत्न -
खरे यांची भाषा शैली हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल - 'एकुणच गत:काळ फार याद येतो' - ते 'कशाने प्रान्त आपला होतो ... सर्व प्रांतावर माझीच तर मुद्रा आहे' - 'कशामुळे मला सातारा आपले वाटते ...' क्या बात है अनंतराव !!!
सर्वात महत्वाचे म्हणजे या पुस्तकांच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे - पुरबी, पंडिnत वहिनी, जाननाक, राधा, व्यंकटनाक, रखमी - यांच्या कहाण्यांमधून - इतिहासाचे महावस्त्र उलगडत जाते - खरे यांना हे प्रमुख सूत्र धरून कथानक गुंफावे वाटणे मला फार महत्वाचे वाटते -
शेवटचे परिशिष्ठ अतिशय मार्मिक आहे. आपल्या सदोष सामाजिक जाणीवेवर खरे नेमके बोट ठेवतात - 'इतिहास ही नेहेमीच प्रक्रिया असते ... एखादी व्यक्ती - मग ती कितीही अलौकिक असली तरी प्रक्रियेची दिशा काही काळापुरती, मर्यादित रूपातच बदलू शकते. प्रक्रिया केंद्रस्थानी, व्यक्ती त्या प्रक्रियेतूनच घडलेली, आणि फार मुलभूत बदल न करू शकणारी, हेच वास्तव असतं.'
वा! झकास पुस्तकाच्या रसग्रहणाने ब्लॉगला सुरुवात केलीत की. ब्लॉगविश्वात मनःपूर्वक स्वागत. :)
ReplyDeletethanks Meghana
ReplyDelete